चारधाम अविस्मरणीय यात्रा
मी आणि माझ्या मैत्रिणीने दुर्ग मल्हार ट्रॅव्हल कडे चारधाम साठी बुकिंग केले, कुठल्याही तीर्थक्षेत्री तिथून बुलावा आल्याशिवाय जाऊ शकत नाही हे अगदी खरे आहे, किती दिवसा पासून मला ह्या तीर्थक्षेत्री जायचे होते पण योग येत नव्हता, शेवटी दुर्ग मल्हार मुळे हा योग जुळून आला त्या साठी खर तर माझी मैत्रीण गौरी हिचे मनापासून आभार,
एवढ्या दिवसापासून मनात दडपण होते नीट सगळ पार पडेल ना शेवटी तो दिवस उजाडला, 26 सप्टेंबर ला आम्ही सगळे दिल्ली एअरपोर्ट वर भेटलो, आमच्या गळ्यात पुष्पमाला घालून आमचे स्वागत करण्यात आले आणि आमच्या प्रवासाला सुरवात झाली.
एकूण आमची 20 जणांची टीम होती, त्यात 2 टूर लीडर होते, एक तर स्वतः कंपनीचे मालक विवेक पाटील आणि त्यांची गोड अशी assistant जयश्री भट,
आणि tour मध्ये जास्तीत जास्त सिनिअर सिटीझन होते परंतु त्यांचा उत्साह पाहता तरुणांना लाजवेल असा होता.
गाडी मध्ये आम्ही मज्जा मस्ती धमाल करत होतो, सोबत विवेक पाटील आम्हाला साथ देत होते, कुठेच हा प्रवास कंटाळवाणा असा वाटला नाही, प्रवास खूप होता परंतु गाडीत आम्ही ज्या पद्धतीने मज्जा मस्ती करत होतो, गाण्यांच्या भेंड्या, वेगवेगळे गेम, गप्पा गोष्टी त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रवासाचा आम्हाला विसर पडत होता, अधून मधून सगळ्यांच्या बॅगे मधून चविष्ठ असा सुखा खाऊ बाहेर येत होता,
हांडे पुरोहित हाटले काकूचे पौष्टिक लाडू सर्वांना मिळाले, तसेच मराठे काकूंची चवदार भाजणीची चकली खाऊन मज्जा आली, मंदार च्या आईच्या हाताची आलेपाक वडी अप्रतिम होती. त्याची चव अजून तोंडात रेंगाळत आहे,
पुरोहित आणि वर्तक काकू तर आजी बाईचा बटवा त्याच्या कडे जे मागू ते मिळत होते,
मराठे काकांचा आवाज तर अगदी खणखणीत त्यांनी गायलेले गाणे ऐकून एखाद्याचा थकवा गेलाच पाहिजे असे होते. आसवाले काका एकदम हसतमुख व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर कुठेही ताण नाही त्याची इच्छा एकच केदारनाथचे दर्शन होणे, आणि केदार बाबांचं त्यांना ताकद देत होते. कोयेंडे लेले जोशी काकू पण लय भारी,
शिंदे काका काकूंची जोडी एकदम न्यारी, एव्हरग्रीन जोडपे.
वर्तक काका ज्या स्पीड ने चालत होते खरच एखाद्या तरुणाला लाजवतील, गोव्या वरून आलेले नंदा गीता एकदम मस्त त्यांची भाषा ऐकायला खूप मस्त वाटत होत, नंदा तर बस मध्ये ज्या चकरा मारत होती आम्ही तिचे नाव शांताबाई ठेवले पण तिचा उत्साह खूप भारी होता, गीताचे स्मित हास्य खूप छान, काही लोक बोलून नाही पण शांत राहून सुद्धा मनाला भावतात,
आणि सर्वात शेवट माझी मैत्रिण गौरी सगळ्यांना ह्या trip मध्ये जाग ठेवले आणि एनर्जी आणली त्यामुळे कुठेही बोर झाले नाही, खूप छान छान गाणी लावून तीने तर सगळ्यांचे मनोरंजन केले
तसेच मी विशेष आभार मानू इच्छिते ड्रायव्हर आणि त्यांचा सोबती खरच इतकी सेफ गाडी चालवली खरंच कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे
आत्ता मी अनुभवलेल्या धामा बद्दल बोलते प्रत्येकाचा अनुभव वेगळा असूच शकतो
प्रथम आम्ही हरिद्वार ला गंगा आरती घेतली, रिमझिम पाऊस पडत होता, आणि सोबत गंगेची आरती मन अगदी प्रसन्न झाले,
दुसऱ्या दिवशी आम्ही यमोनित्री धामाच्या दर्शनाला प्रस्थान झालो. आणि माझ्या साठी अगदी सुखद धक्का होता, vc वर गुरुशिखराचे दर्शन दुर्ग मल्हार च्या टीम ने दिले, तेव्हाच माझ्या मनात आले बापाने ग्रीन सिग्नल दिला ना आता चार धाम पूर्ण होते, 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, 🙏
विवेक सर आधीच बोलले होते यमोनित्री धाम कठीण आहे, मला हा dham म्हणजे आई वाटली परीक्षेसाठी आपल्या बाळांची तयारी करून ghet होती कुठेच खचू दिले नाही तिने, तिला माहित होते आता त्रास घेतला तर पुढे माझी बाळ टिकतील, दर्शन खूप सुंदर झाले खरच तिचे भाव शांत आणि प्रसन्न तिला पाहून सगळा शीण निघून गेला, वाटेत पहाडी लोक खरच मनाला भावली, त्यांचा प्रामाणिकपणा मनाला भावला. रात्री आम्ही खाली उतरल्यावर मस्त गरमा गरम आलू पराठा खाल्ला तो सुद्धा अगदी लक्षात ठेवण्या सारखा
दुसरा धाम गंगोत्री लेकरं थकल्यावर आई जशी काळजी घेते तशी तिने आमची काळजी घेतली तिच्या काठाशी आम्ही विसावलो. जस थकलेलं बाळ आई च्या कुशीत शांत होतं अगदी तसेच काही आम्ही सगळे होतो. गंगा मैया चे खूप छान असे दर्शन झाले.
नंतर होता आमचा तिसरा धाम केदारनाथ, जे मला खरं तर एक गुरू शिक्षक वाटले. ज्या प्रकारे साधक आपल्या गुरुच्या शोधात असताना खडतर प्रवास पार पडतो तसा काही हा प्रवास होता. शिक्षक जसे कधी मृदू कधी कडक कधी प्रेमळ असतात, त्या त्या प्रमाणे केदार बाबा आमची परीक्षा घेत होते, खरं तर इथे नंबर कोणालाच गाठायचा नसतो ज्याची त्याची भक्ती भावना वेगळी आहे जो तो त्या त्या परीने पार पडतो, बाबांना सगळी मुलं सारखी म्हणून काही सावकाश चालणाऱ्या मुलांची साथ सोडत नाही आणि भर भर चालणाऱ्यांचे कौतुक करत नाहीत.
मला लास्ट टप्पा अगदी चालवत नव्हता, झोप अनावर होत होती विवेक सरांनी अगदी जिवलग मित्रा सारखी मला आणि मंदारला शेवट पर्यंत साथ दिली, तो कठीण टप्पा कसा पार करवून दिला त्या साठी त्यांचे खरच आभार🙏 एका कंपनीचा मालक लोकांशी एवढ्या आपुलकीने वागत आहे काही कमी पडत नाही आहे ना ह्याची खबरदारी घेत आहे त्यांचा हा गुण कौतुक करण्या सारखाच आहे.
शेवटी केदारनाथ la मंदिर बघितल्यावर सगळा थकवा निघून गेला, थंडी far होती अगदी बोचत होती परंतु आतुरता होती बाबांच्या दर्शनाची शेवटी ती वेळ आली आम्हाला ब्रह्म मुहूर्तावर केदार बाबांचे दर्शन झाले, बाहेर जरी थंडी असली तरी मंदिरात उष्णता जाणवत होती,वेगळेच vibes होते, डोळे भरून दर्शन घेतले, तसेच भीमशीला चे सुद्धा दर्शन घेतले, जयू आणि मी तर मंदिर परिसरात खूप छान वेळ घालवला, तेव्हा गर्दीही फार कमी होती, आसवाले काकांचा तर दर्शनाने चेहरा खुलला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही भैरवनाथाचे दर्शन घेतले, अश्या हया केदारनाथने (गुरुने शिष्याला साहस, ध्येय, संयम, धाडस, शिकवले, आणि अहंकार हा कुठल्याच गोष्टीचा नसावा, आणि असल्यास तो त्या शक्ती पुढे विरघळून जावा ) हे मी तरी अनुभवले. जय केदारेश्वर
एक गोष्ट मी सांगू इच्छिते केदार चढत असताना मुखी सतत गिरनारी येत होते, माझे मन गिरनारी होते, बोलतात ना बाबा का खेल बाबा ही जाने, जय गिरनारी
आता शेवटचा धाम बद्रीनाथ मला हा धाम म्हणजे वडील वाटले. जे आपल्या मुलांचा हट्ट सहजासहजी पूर्ण करत नाहीत, प्रेम असते, परंतु प्रत्येक गोष्टीची किंमत असली पाहिजे, खूप प्रयत्न करूनही दर्शन मिळत नव्हते, शेवटी कळसाचे दर्शन घेऊन जावे लागणार की काय निराश होऊन आम्ही जाणार तेच नंदा आमची मैत्रीण हिने कुठून ek भटजी शोधला आणि त्याच्या कृपेने दर्शन झाले, बोलतात ना जर त्याची इच्छा असेल तर दर्शन मिळतेच, ह्या धामा कडून ही शिकली की आयुष्यात संयम खूप महत्वाचा आहे आणि कधीच कोणाला कमी लेखू नये कोण कधी कुठे आपल्या उपयोगी पडेल सांगू शकत नाही आयुष्यात सगळे संपले असे वाटते तेव्हाच खरी देवाची कृपा सुरू होते, अशा प्रकारे बद्रीनाथ धाम पण झाला.
चारधाम खरंच अवघड आहे परतू आपला त्या शक्तीवर विश्वास असला आणि संपूर्ण सरेंडर भावना असली की ती शक्ती साथ नक्कीच देते,
माझे कौतुक केले गेले मी चढली उतरली त्या साठी खरच धन्यवाद, पण मी खरच सांगू इच्छिते आपण चढत नसतो चढवले जात असतो, मग तुम्ही कुठली शक्ती म्हणा किंवा कुठला देव म्हणा,
माझ्यासाठी माझ्या दत्तगुरु आणि शंकर महाराजांमुळेच मी चारधाम पूर्ण करू शकले आपण पामर आपण काय पूर्ण करणार विश्वास आणि श्रद्धा असली की ते पूर्ण करून घेणार🙏
ह्या यात्रे मध्ये मला ड्राइवर cha सोबती होता त्याचे विशेष आभार करायचे आहेत कर्म आणि धर्म ह्या दोन्ही गोष्टी मला दिसून आल्या, त्याने त्याचे कर्म बरोबर पार पाडले त्यात कुठलाच अपवाद नाही परंतु आम्ही जेव्हा गाडीत बसलो होतो केदारनाथ उतरुन आल्यावर त्यावेळी आपके पास कम्बल हैं ना ओडने के लिये ह्याची सुद्धा चौकशी केली त्याने, जेव्हा परतीचा प्रवास करताना आमची गाडी बंद पडली तेव्हा साथ मैं किसी जेन्टस को लेके जाना लेडीज अकेले मत जाना, ही गोष्ट माझ्या मनाला खूप भावली मी कधीच विसरू शकत नाही, ह्या जगात चांगली माणसं सुद्धा आहेत आणि आपल्याला त्यांचा सहवास लाभणे हे सुद्धा भाग्यच, तर ही यात्रा बरच काही शिकवून गेली, चुकून कोणाच नाव राहून गेल असेल तर क्षमा असावी🙏
खरच दुर्ग मल्हारचे खूप आभार, अगदी परतीच्या प्रवास पर्यंत सगळ्यांची तुम्ही काळजी घेतलात.
इथे मी नमूद करू इच्छिते आमच्या गाडी बिगाडी आणि ट्रॅफिक मुळे दिल्ली एअरपोर्ट la आम्ही लेट पोचलो, त्या वेळी विवेक सर आणि जयू ज्या प्रकारे धावपळ करत होते आणि प्रत्येकाला जी साथ देत होते it was commendable. त्यांनी अगदी विमानात सगळ्यांना सुखरूप बसवले, दुर्ग मल्हार मला खरच खूप जवळचे वाटले, आपण आपल्या आई बाबा किंवा सासू सासरे सिनिअर सिटीझन ना दुर्ग मल्हार सोबत अगदी विश्वासाने पाठवू शकतो हे मी तरी माझ्या पहिल्याच ट्रिप मध्ये अनुभवले.
काही लोकांचे ह्यात दुमत असेल की business साठी हे करावेच लागते परंतु माणसाचा स्वभाव हा मुळात जर मदत करणारा असेल तर तो त्याची post position विचार करत नाही कसा ही मदत करणारच हे मी अनुभवले
आणि ज्यांच्या बिसनेस ची नाळच गिरनारशी जोडली आहे, तिथे सेवा भाव,शिस्त हे सगळे आलेच 🙏 बाकी तर दत्त महाराज सर्वच जाणतात 🙌
पुढील ट्रिप नक्की तुमच्या सोबत करणार 🙏
दुर्ग मल्हार मुळे मला एक छान मैत्रीण भेटली जयू 😊❤️
सुजल परब 😊
