*माधुरी अहिरे*
*जय गिरनारी २.*
खरंच गिरनार परिक्रमा हा एक विलक्षण अध्यात्मिक अनुभव आहे. कारण मनात नसतानाही मी परत एकदा
गुरु शिखराकडे आणि गिरनार परिक्रमा कडे खेचले गेले.
मी निखिल वैद्य, बदलापूर येथे त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले असता, निखिल सहज म्हणाला कि “मॅडम तुम्ही परत गिरनारी दर्शन घ्यायला येणार आहात का ? कारण आम्ही सर्व वैद्य कुटुंबिय असे १२ / १५ जण जाणार आहोत.” मी क्षणभर विचार करून लगेच होकार कळवला.कारण १०/१५ जणं वैद्य कुटुंबिय माझ्या चांगल्या परिचयाचे होते.
तसेच गेल्या वर्षीचा अविस्मरणीय आनंददायी अनुभव, तोही विवेक पाटील ह्यांच्या दुर्ग मल्हार बरोबर आणि निखिल वैद्य चे सर्वां प्रती असलेलं वैयक्तिक लक्ष.
*आणि हे सगळे ह्या वर्षी पण अनुभवायला मिळाले.खरोखर विवेक पाटील आणि दुर्ग मल्हार टीमचे कोतुक करावे तेवढे थोडेच आहे.वेळच्या वेळी सर्व व्यवस्था पुरवण्यात आल्या.म्हणूनच कि काय प्रत्येकाला पुन्हा पुन्हा दुर्ग मल्हार बरोबर दर्शनाला यायची इच्छा होते.*
पण मला एक बाब माझ्या बाबतीत विशेष करून
सांगावेसे वाटते की *माझे ह्या वर्षी दोनदा गुरू शिखर,एकदा गिरनार परिक्रमा सहित झाले. थोडक्यात माझ्या दोन वेळा रोप सहीत २५००० पायरींचा चढ उतार झाला.एक विशिष्ट शक्ति आपल्या बरोबर सोबत करीत असते ह्याचा अनुभव मला तेव्हा जाणवला.*
हा विरळ अनुभव मला विवेक पाटील, दुर्ग मल्हार टीम आणि निखिल वैद्य चे वैयक्तिक लक्ष ह्या सर्वांमुळे मिळाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
*मला वाटतं हा आनंददायी अनुभव आपण सर्वांनी एकदा तरी दुर्ग मल्हार बरोबर घ्यावा.*
*दुर्ग मल्हार टीमचे खूप खूप कौतुक आणि खुप खुप धन्यवाद.
तसेच शुभेच्छा आणि उत्तरोत्तर आपली प्रगती होवो ही सदिच्छा.*
*सारं काही शब्दात वर्णन करण्या पलीकडले होतं तरी थोडक्यात शब्दात कथन करणारा प्रयत्न*
*डॉ.माधुरी अहिरे*
०३ डिसेंबर २०२४
मो.न.९००४०३७५५४