Children Camp

WhatsApp-Image-2024-07-01-at-11.00.25-PM-2-4.jpegWhatsApp-Image-2024-07-01-at-11.00.25-PM-1-3.jpegWhatsApp-Image-2024-07-01-at-11.00.25-PM-2.jpegWhatsApp-Image-2024-07-01-at-11.00.21-PM-1.jpegWhatsApp-Image-2024-07-01-at-11.00.16-PM-0.jpeg

दुर्ग मल्हारच्या children camp बद्दल तुम्हा पालकांचे जे फीडबॅक आले आणि तत्परतेने तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवले त्यासाठी धन्यवाद.
मुलांचा कॅम्प म्हणजे फक्त आम्ही शिकवतो आणि मुले शिकतात असं नसत. मुलांसोबत आम्ही पण काहीतरी शिकत असतो. नव्या पिढीचे ज्ञान बघून अचंबित व्हायला होत.कॅम्पला आलेलं प्रत्येक मुल खूप हुशार होत. प्रत्येक जण काहीतरी वैशिष्ट्यामुळे लक्षात राहिला.
संस्कृत मध्ये स्वतः ची ओळख करून देणारा अंगद.
मूर्ती लहान पण बडबड महान अशी सई.
आई बाबांसोबत हिमालयात ट्रेक करणारी,गोड आवाजाची शलाका.
कायम सगळ्यांची काळजी घेणारी देवयानी.
मलबेरी खायला दिल्यावर, जाताना आई साठी घेऊन जाईन म्हणणारा स्वानिक
प्रचंड एनर्जी असलेले शुभम, आदित्य
खोड्या काढता काढता स्वतः च सगळ्यांचं टार्गेट होणारा, गाण्याची आवड असलेला आणि रोज 4 वाजता उठून योगा करतो असं सांगणारा कुशल उर्फ कुकू
एकमेकांची प्रचंड काळजी घेणारे बहीण भाऊ नील, स्वरा.
शांत, आज्ञाधारक चित्रांशू.
सगळ्यांसोबत राहून सगळ्या ॲक्टिविटी करणारी , कमी बोलणारी सानिका.
Activity सुरू झाली की काहीतरी कारण काढून मध्येच ब्रेक घेणारे वेदांत, आराध्या.
बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीज चे भावी मालक ‘arpit birla ‘
आपापल्या ग्रुप ची जबाबदारी उत्तम निभावणारे मल्हार, ओंकार, नील
समजूतदार सृजन, मांगरिष.
घरचा कॅम्प असताना आई, बाबांपासून लांब रहाणारी, त्यांना हाक ही न मारणारी गुणी गार्गी
अचानक विष्णू बागेत आलेला आणि कॅम्पला जॉईन होऊन फुल एन्जॉय करणारा प्रितेश .
खूप मजा आली सगळ्यांसोबत. मुलांकडे खूप ऊर्जा आहे आणि ती प्रोपरली चॅनलाईज होण्याची गरज आहे. आम्ही तो एक छोटासा प्रयत्न केला. मुलांनी सर्व भाज्या खाव्या किंवा न आवडणारा पदार्थ निदान चमचाभर तरी खावा म्हणून आम्ही compulsion केलं होत. मुलांची भीती जावी म्हणून adventure activity ला त्यांना प्रोत्साहन ही दिलं. आणि मुले पण एकमेकांना प्रोत्साहन देत होती हे खूप छान होत.
आजकालच्या न्युक्लिअर फॅमिली आणि बिझी शेड्युल मुळे मुले घरात एकटी पडतात. पण कँपच्या निमित्ताने मुलांना मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहीण अशी अनेक नाती अनुभवता आली. पूर्वी मामाच्या गावाला गेल्यावर अंगणात झोपून चांदण्या बघण्याचा आनंद आपण घेतला असेल पण तो आनंद मुलांनी एकत्र टेन्ट मध्ये झोपणे, रात्री आकाश बघणे, शेकोटी आणि त्याभोवती ची स्फूर्ती गीते, गाणी ह्यातून घेतला. भरपूर मैदानी खेळ, धावाधाव, व्यायाम, दिवसभराच्या activity घेऊन ही मुले थकत नव्हती, परत रात्री टेन्ट मध्ये मजा, मस्ती चालू च राहायची. कुठून एवढी एनर्जी येते ह्यांच्याकडे असा प्रश्न पडायचा.
विष्णू बागच्या नेचर ट्रेल ला वनस्पतींची माहिती पण शांत पणे ऐकणारी, वारली पेंटिंग समरसून करणारी, माझ्या सेशन ला चांगला प्रतिसाद देणारी सगळी गुणी बाळ होती.
मुलांसोबत आम्हालाही खूप मजा आली. तुम्ही आमच्यावर विश्र्वासून आमच्या सोबत तुमचे काळजाचे तुकडे पाठवले त्यासाठी धन्यवाद. मुले develop व्हावीत म्हणून आम्ही आमच्याकडुन थोडे प्रयत्न केलेत.
पत्रलेखन हा ही त्याचाच एक भाग.
मुलांसाठी, मोठ्यांसाठी दुर्ग मल्हार ट्रेक आयोजित करते. आपण ही मुलांसोबत नक्की सहभागी व्हा. फॅमिली साठी टूर्स असतात त्याला ही या असं आग्रहाचं निमंत्रण.
मुलांना त्याच्या वयात येण्याच्या काळातले अडथळे दूर करून अभ्यासात प्रगती व्हावी ह्यासाठी काही दररोज करायचे प्रकार सांगितले आहेत. ते फक्त त्यांच्याकडून नियमित करून घ्या. काही शंका असतील तर नक्की फोन अथवा मेसेज करा.
आपली,
माधवी लोकरे
( दुर्ग मल्हार टीम)

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these