Amarnath Yatra

1000182195-2.jpg1000182204-1.jpg1000182198-0.jpg

ओम नमः शिवाय

माझ्या बकेट लीस्ट मधील अमरनाथ हे प्रथम क्रमांकावरील ठिकाण. परंतु दरवेळेस काही ना काही कारणामुळ े मला ते जमत नव्हते. प्रत्येकाला देवाच्या जवळ जाण्याची इच्छा असते. परंतु खूप कमी भाग्यवान लोक असतात ज्यांच्या सोबत देव स्वतः सतत राहत असतो. त्या व्यक्तीसोबत सतत एक दैवी शक्ती असते आण ि मला वाटते ती दैवी शक्ती श्री. विवेक पाटील, (जय गिरिनारी दत्ताच े परम भक्त) आयोजक दुर्गमल्हार यांचेकडे निश्चितच आह े याची प्रचिती मला आली आहे. दरवर्षी भाविकांना घेऊन दूर करणे व त्यांच्यासमवेत जाण े हे खरचच भाग्य आहे.

मार्च महिन्यांत दुर्गमल्हार टूर्सतर्फे अमरनाथ यात्रा दि. ६.७. ते ११.०७.२५ आयोजित केली होती. त्यानुसार नांव नोंदणी व पुढील रीतसर बाबींची पूर्तता करणेबाबत सूचना प्राप्त होत होत्या. प्राथमीक बाबी ं जस े की प्रोसेस फी व सी.एच.सी. जमा करण्यास सुरुवातही झाली. प्रथमतः ५३ सदस्यांची नोंदणी झाली होती. यामध्ये गोवा, पुणे, ठाण े मुलुंड, मुंबई बदलापूर येथील भाविक होते. सदर यात्रेतील काही मार्गक्रमणा ही हेलीकॉपटरने करावयाची होती. त्यामुळ े सर्वचजण खुश होते. यात्रेसाठी वयाच े बंधन होते. मी नुकतेच ६८ व्या वर्षात पदार्पण केले होते व शारिरीक प्रकृतीही उत्तम होती.

पण म्हणतात ना देव असा सहजासहजी कोणालाच प्रसन्न होत नाही. पथ्वीवरील स्वर्गात तो आपले अधिष्ठान मांडून शांतपणे ध्यानस्थ बसला आहे. अशातच दि. २२.०४.२५ रोजी पहलगाममध्ये आतंकवादी हल्ला झाला. अतिशय भयास्पद / घृणास्पद घटना होती. पण त्यानंतरचे ऑपरेशन “सिंदूर” ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब होती.

या दुर्दैवी घटनेचा परिणाम अमरनाथ यात्रेवर व्हायचा तोच झाला. लोकांमध्ये भितीच े वातावरण तयार झाले कित्येकांनी लगेचच नाव रदद केले पण श्री. विवेक पाटील यांच्या जिददीला सलाम त्यांनी त्यांच े मॉरल कुठेच कमी पड ू दिले नाही. गूगल मीटव्दारे मीटीग घेऊन प्रत्येकाच्या शंकाचे निरसन केले पण तरीही शेवटी भाविकांची संख्या २१ वर निश्चित झाली. त्याला दुसरेकारण म्हणज े हेलीकॉपटर सेवा सुरक्षिततेच्या दृष्टीन े रदद करण्यांत आली. अमरनाथ यात्रा मार्गक्रमण करु लागली. यातील बहुसंख्य हे सीनीयर सिटीझनच होते.

दि.६. ता. मुक्काम श्रीनगर हॉटेल सागर इंटरनॅशनल ३ स्टार त्यानंतर दल लेक फेरफटका, खरेदी. ६ तारखेला आषाढी एकादशी होती व बहुतेकांच े उपवास असल्याने सौ. अलकाताई जहागीरदार यांनी स्वतः किचनमध्य े जाऊन बनवलेली भगर व दाण्याच्या कुटाची आमटीची चव तर अप्रतिमच. त्याच्या जोडीला श्री. विवेक पाटील यांच्या अर्धांगिनीन े (सौ. सोनल) सर्वांसाठी पाठविलेल्या दाण्याच्या लाडूची चवतर अजूनही जीभेवर रेंगाळत आहे. सर्वजण तृप्त मनान े झोपी गेलो.
दि. ७. सोनमर्गकडे सकाळी प्रयाण केले. वाटेतच आरएफआयडी कार्ड काढण्यासाठी थांबावे लागले. तेथेच एक लंगर होता. खुपच छान होता. तेथे बाबा बर्फानी यांच े “भुके को रोटी प्यास े को पानी ” अशा भोलेनाथ शिवजींची लग्नाच्या वरातीपासूनची सर्व गाणी लावली होती व त्यावर दिल्ली येथून आलेला नवयुवकांचा ग्रुप ठेका धरुन बेधुंदपण े नाचत होता. त्यांचे ते ठेक्यावरती थरथरणारे पाय पाहून आम्हालाही खुप हुरुप आला व आम्हीही गाण्यावरती ठेका धरला. थंडीचा मागमूसही नव्हता. आमची रजिस्ट्रेशन पूर्ण करुन पुढील मार्गक्रमणा सुरु झाली.

सोनमर्ग येथ े हॉटेल “ताजवास” येथ े मुक्काम होता. पहलगाम हल्यानंतर नुकतीच हॉटेल सुरु झाली होती. सभोवार हिरवीकंच झाडी, सिंध ु नदीच े खळखळणारे निर्मळजल. स्वर्ग म्हणज े काय हे येथे आल्यावरच कळते. थोडी विश्रांती घेतल्यानंतर बहुतेकजण झीरोपॉईंट बघायला गेले. तेथे त्यांनी बर्फाची मजा तसेच वातावरणाची नजाकत अनुभवली. रात्रीच सुचना मिळाल्यानुसार पहाट े १.३० वाजता बालताडला जाण्यासाठी निघायच े होते. बहुतेक कोणी झोपलेच नाही व बाबा बर्फानी यांच े दर्शन घेण्यासाठी सर्वजण तयार होउन सकाळी २. ०० वा. निघालो. बालताड दृष्टीक्षेपात आले आण ि एक अनामिक हुरहूर सुरु झाली. भिती वाटायला लागली आता खरोखरच बाबा बर्फानी यांच्या दर्शनाच्या वाटेची सुरुवात सुरु झाली होती.

दि. ८.७. पण आमच्या गाडया आधीच ५-६ कि.मी. वर थांबविण्यांत आल्या. “कॉनव्हॉय “जाणार असल्याचे सांगून आम्हाला तो जो पर्यत जात नाही तोपर्यत गाडया सोडणार नाही असे मिल्ट्रीन े सांगितले. त्यांना बसमध्ये सिनीयर सिटीझन आहेत सांगूनही त्यांनी सोडले नाही. थांबलो तर चढण्यास उशीर होणार होता. म्हणून आम्ही तेथेच खाली उतरलो व रात्री ३.०० वा. चालावयास सुरवात केली. आकाश निरभ्र होते. गुरुपौर्णिमा जवळ येत असल्याने आकाशीचा चंद्र व तारका आम्हाला भोलेनाथ यांच े दर्शनाचा मार्ग दाखवित होते. यात टूर लीडर गणेश व प्रशांत सरही मार्गदर्शन करीतच होते.

अंतिमतः जेथून घोडे व पालख्या आम्हाला घेऊन जाण्यासाठीच्या थांब्याजवळ आम्ही आलो. श्री. विवेक पाटील, यांच े उत्तम नियोजन व जनसंपर्कीमुळ े लगेचच सर्वांना आपआपल्या सोयीनुसार घोडे व पालख्या मिळाल्या. पण आमच्यातही महाराष्ट्राचे ३ मर्द मावळे होते. बदलापूरचे श्री. समीर भोपी व पुण्याच े दोघेजण अशा तीघांनी मिळून पायी प्रवास सुरु केला. अतिशय खडतर असा प्रवास होता. आम्ही पाच सहा जणांनी पालखी केल्या होत्या. पण त्यात बसताना अतिशय गिल्टी वाटत होते. आपला भार दुस-यावर देऊन देवाच े दर्शन घेण े मनाला पटत नव्हते. पण नाईलाच होता. पालखी म्हणज े खर्ची व त्याला बाधलेले दोन बांब ू येथील लोकांचा हाच उत्पन्नाचा मार्ग. तोही एक महिन्यापुरताच. ते महिनाभरात साधारण २५०००/- पर्यंत कमवतात.
ठेक्यात शिस्तबध्द असे पालखी धारकांच े पाय पडत होते व सुचना देऊनच खांदेबदल होत होता. निसर्गाची साथ लाभली होती. पाऊस रात्रीच व पडून गेल्यान े वातावरण छान होते. थंडी बिलकुलच नव्हती. आजूबाजूला निसर्ग अतिशय देखणा होता. डोळयांत किती आण ि काय साठवून घेऊ हेच कळतच नव्हते. रस्त्यांत जागोजागी भाविकांसाठी लंगर, मेडीकल कॅम्प लावण्यांत आले होते. पण एकाच गोष्टीच े वाईट वाटत होते की, लंगरमध्ये पालखी वाहणा-यांसाठी ते जेवण देत नसल्याच े माझ्या पालखी वाहणा-यांनी सांगितले. मार्गक्रमण करीत असताना माझ्या पालखी वाहणा-या दोघांना पायाला जखमा झाल्याच े दिसल्यान े मी त्यांना माझेकडील तसेच मेडीकल कॅम्पमधील औषधोपचार दिले. तसेच भोजनासाठीची व्यवस्था केली. अतिशय चढावरती व उतारावरती समजूतदारपणान े मी उतरत होते व पालखीवाल्याच ें थोडासा दिलासा देत होते. रस्ता दगड धोंडयाचा होता अतिशय तीव्र चढउताराचाही होता.

रस्त्यांत कालीमातेची भव्य मुर्ती पहाडामध्ये खोदलेली आह े तीचे दर्शन जाता जाता घेतले. शेवटी सकाळी ११.३० वा. बाबा बर्फानी यांच े दैवी गुहेमध्य े जाण्यासाठी पाय-या चढण्यास सुरवात केली. साधारणपण े ३०० पाय-या आहेत. त्यात ज्यांनी पालखी केली आह े त्यांच्यासाठी अर्ध्यापर्यंत पालखी नेण्याची सोय आहे. अतिशय शिस्तबध्द रांग, जागोजागी बंदुकधारी मिल्ट्रीच े सैनिक. आवश्यक त्या सुचना देत होते. जेंव्हा “बर्फानी बाबांच्या” समोरच्या पायरीवर उभ े राहीले तेंव्हा अतिशय कृतकृत्य वाटत होते. ग्लोबल वॉर्मीगमुळ े बर्फाची पीड १ ते दीड फूटच होती. पण त्या दैवी गुंफेत प्रवेश केल्याचे समाधान होते. याचसाठी केला होता अटटाहास. मनोभावे भोलेनाथाना ं वंदन करून पुढील उतरणीच्या प्रवासाची मार्गक्रमणा करण्यांस सुरुवात केली.

वातावरणांत हळूहळ ू बदल होत होता. सगळीकडे अनाउंसमेंट सुरु झाली होती व लवकरांत लवकर खाली जाण्यासाठी सांगत होते. पालखीवालेही घाई करू लागले होते. अतिमतः सायंकाळी ५.३० वा. बालताडला पोहचले. तेथे टेंटमध्ये थोडावेळासाठी थांबलो होतो. आम्ही पालखीवाले सुखरूप पोहोचलो होतो पण घोडयावरील मंडळी अजून यायची होती. अशातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसात बहुतेक जण अडकले होते. पण सर्वात कौतुकाची बाब म्हणज े आमचा मर्द मावळा श्री. समीर भोपी चालत जाऊन परतला होता. पण चेह-यावरती जराही दमल्याच े भाव नव्हते. फक्त घोडयावर असलेल्या बायकोची विद्याची चिंता मात्र जाणवत होती. मात्र पुण्याच े दोघेजण येताना घोडयावरुप परत आले होते. घोडयांवरुन आलेल्याची अवस्था मात्र अतिशय कठीण झाली होती. सर्वचजण अतिशय दमले होते. दोघी तीघींना त्रास होत होता. त्यात दूर लिडर गणेशचाही समावेश होता.

रात्री ८.०० वा. बालताड सोडून आम्ही सोनमर्गला परत आलो व तेथे रात्री मुक्काम करुन सकाळी दि. ९ रोजी श्रीनगरकडे प्रयाण केले. रस्त्यातच सिंध ू नदीमध्ये उतरुन तीचे दर्शन घेतले व वाटेतच ड्रायफ्रूटस व इतर खरेदी करून पुन्हा हॉटेलवर आलो. रात्री जेवण करुन छानपैकी अलकाताईंनी “झगा हे भारुड व डोंगर” या गाण्यावर सर्वांना ठेका धरुन नाचवले.
तसेच इतरही छोटेमोठे खेळ घेतले. पौर्णमेचा चंद्र आकाशात डोकावत असल्याने दल लेकवर जाण्याचा मोह आवरला नाही व एक छानसा फेरफटका व आईस्क्रीम खावून झोपी गेलो.

आता परतीच्या प्रवासाच े वेध सुरु झाले होते. दि. ११ रोजी गुरुपौर्णिमा असल्याने जगतगरु शंकराचार्य यांच े दर्शन घेऊन नंतर मुघल गार्डन व परिमहल गार्डन बघून आमचा ताफा श्रीनगर विमानतळाच्या दिशेने रवाना झाला.

ता.क.

मला सर्व प्रवासा दरम्यान मदतीचा हात देऊन अतिशय मोलाच े सहाय्य सर्वांनी केले याबददल मी सर्वांच े आभार मानते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these