गिरनार हि एक शब्दातीत अध्यात्मिक अनुभूती आहे. दुर्गमल्हार च्या चमूने ती आणखी एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवली. उत्तम, बिनचूक नियोजन आणि अगत्यशील वागणूक यामुळे परक्या कुणी नव्हे तर अनुभवी कुटुंब सदस्यांसोबत सहल करीत असल्याचीच भावना होत गेली . त्यामुळेच माधवी मॅडम च्या आपोआपच माधवीताई आणि किरण चा किरणदादा झाला. अनुभवी मार्गदर्शन आणि संयत आवाजात संमोहन केल्याप्रमाणे झालेल्या आटोपशीर आढावा आणि मार्गदर्शन बैठका खूपच प्रत्ययकारी होत्या.आमच्यासोबत असणाऱ्या ४-६ वर्षे वयापासून ते ७६ री पार केलेल्या माझ्या वडिलांपर्यंत सगळ्यांच्या वैयक्तिक गरजा ओळखून दिलेलं सहकार्य औपचारिकतेच्या मर्यादा ओलांडून कौटुंबिक जिव्हाळ्याचा पातळीवर पोचलं. गिरनारच्या उच्च अध्यात्मिक अनुभूतीला जोड देण्यासाठी केलेलं स्वामी नारायण मंदिर आणि सोरटी सोमनाथ चं नियोजन देखील सोनेपे सुहागा असं झालं. गिरनार उतरून आल्यावर आयोजित केलेलं तज्ज्ञ मालिश इतकं परिणामकारक होतं कि सगळा थकवा विसरून लागलीच बच्चे मंडळींच्या आग्रहस्तव जवळच जुनागडच्या अतिशय उत्कृष्ट अशा प्राणी संग्रहलयाला भेट देखिल देऊन आलो.
एकूणच माधवी ताई, किरण, पर्यायाने दुर्गमल्हारच्या बोट ठेवायला जागा नसणाऱ्या उत्कृष्ट नियोजनाने आणि अनौपचारिक अगत्याने आमची गिरनार, सोमनाथ सहल अगदी अविस्मरणीय झाली.

