लडाख ट्रिप

WhatsApp-Image-2024-06-27-at-8.10.13-PM-1.jpegWhatsApp-Image-2024-06-27-at-8.10.12-PM-0.jpeg

2011 ला अचानक रद्द झालेली लडाख ट्रिप पूर्ण करायला मिळणार म्हणून खूप आनंद झाला होता,त्यात पहिला विमानप्रवास.
श्रीनगर-द्रास -कारगिल -लेह असा रूट होता.द्रास पर्यंत सगळं व्यवस्थित होतं.फटू-ला ओलांडताना मात्र लडाख ने मला AMS (Accute Mountain Sickness) चा हिसका दाखवायला सुरुवात केली.उलट्या,डोकेदुखी,अस्वस्थता यांनी घेरलं.त्या दरम्यान दुर्गमल्हार चे आयोजक व सर्व सहकारी यांनी खूप काळजी घेतली.औषधोपचार चालूच होते तरीही डोकेदुखी ometing काही कमी होत नव्हते.लेहदर्शन ही पार पडले.दुसऱ्या दिवशी खारदुगला -ला जायचे होते पुढे त्रास व्हायला नको म्हणून विवेक सर आम्हा दोघीतिघीना घेऊन हॉस्पिटल मध्ये आले.ऑक्सिजन लेव्हल चेक केल्यानंतर डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतले.ही लेव्हल 30 च्या ही खाली उतरली होती.मी पूर्ण blank झाले आता पुढे काय वाढून ठेवलय काय माहीत,आपल्यामुळे सगळ्यांना त्रास होणार आहे या विचाराने अजूनच अस्वस्थ झाले.
“डॉ जे म्हणतील ते आपण करू तुम्ही काही काळजी करी नका”या विवेकसरांच्या शब्दांनी खूप दिलासा मिळाला.
मुकाट्याने ऑक्सिजन लावून अराम करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.
पडल्यापाडल्या डोक्यात विचार चक्र चालू होते की माझ्या बाबतीत असे का झाले? मी योगशिक्षक आहे ,स्वतः पण योगा करते याचा काय उपयोग?,जो तो हेच म्हणत होता की अरे तुम्ही योगशिक्षक असून असे का झाले?माझ्याकडेच याचे उत्तर नव्हते.दुसरे दिवशी डिस्चार्ज मिळाला.मी आणि माझ्याबरोबर असलेल्या काकू हॉटेल मध्ये परतलो.
विवेक सरांनी तेथेही ऑक्सिजनची व्ययस्था केली.तो पूर्ण दिवस अराम केला .आप्तेष्टांशी बोलताना भाऊ म्हणाला योगामुळे तुला किती फायदा झाला.ऑक्सिजन लेव्हल इतकी कमी असताना देखील माझा मेंदू, हृदय अतिशय व्यवस्थित काम करत होते. प्राणायाम च्या सरावामूळे आहे तो ऑक्सिजन शरीरासाठी योग्य रीतीने वापरला जात होता असंच म्हणावं लागेल.

दोन दिवसांच्या विश्रांती नंतर चांग-ला, पेंगोंग ला जाताना मी पूर्ण फिट होते आणि खूप njoy पण केले.
एकंदरीत योगाच्या सारवाने मला परिस्थितीतुन अलगद बाहेर काढले. विवेक पाटील सर यांनी केलेली धावपळ आणि घेतलेली काळजी याला तोड नाही.
प्रत्येक ट्रिप सुरळीत पार पडतेच असे नाही किंवा सगळीच ठिकाणे पाहिले म्हणजेच ट्रिप सफल होते असे नाही तर त्यात येणाऱ्या अडचणी मात्र आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि आपल्या भविष्यातल्या वाटचालीसाठी इंधन पुरवतात.हेच तर सहलीचे फलीत असते.
यशश्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these