मागच्या वर्षी मी ऑक्टोबर मध्ये गिरनार ला गुरुशिखराचे दर्शन घेण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढून गेले होते आणि त्यावेळी मला दुर्ग मल्हार ची गिरनार परिक्रमा आहे हे कळले पण ती पुढे जाऊन लगेच नोव्हेंबर मध्ये होती म्हणून मला जायला जमले नाही पण मी तेव्हाच ठरवलेले की आपण पुढच्या वर्षी नक्की गिरनार परिक्रमेला जायचे. गिरनार परिक्रमा हे काय असते हे तर काहीच माहिती नव्हतं. पण जसे जसे दिवस जवळ येत गेले आणि यावर्षीचा नोव्हेंबर महिना जवळ आला तेव्हा मी युट्युब वर परिक्रमेचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली .खूप व्हिडिओ पाहिले त्यामुळे थोडी कल्पना आली. ही गिरनार परिक्रमा तशी काही सोपी नाही बरीच खडतर आहे पण मनाची तयारी तर आधीच केलेली. परिक्रमा करून गुरुशिखर चढून उतरायचे त्याप्रमाणे जायचा दिवस उजाडला आम्ही 23 नोव्हेंबरला पहाटे पाच वाजता दादर एक्सप्रेस ने मुंबई पर्यंत गेलो मग तिथून रात्री 11 वाजता राजकोटची ट्रेन होती आणि राजकोटला 24 नोव्हेंबरला सकाळी साडेआठला पोहोचलो तिथून दुर्गमल्हारने आमची जुनागढ जाण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. एकूण आम्ही 80 जण होतो .सगळे आम्ही जुनागढ ला भारतीय अश्रम येथे राहिलो होतो, साधारण 12 वाजता दुपारी आम्ही जुनागडला पोहोचलो आणि मग पूर्ण दिवस आराम केला रात्री जेवून वगैरे आम्ही थोडा आराम करून पहाटे तीन वाजता गिरनार परिक्रमेसाठी एकत्र जमलो मग एकत्र पूजा करून फॉरेस्ट ची गेट आहे तिथून बरोबर साडेतीन वाजता आम्ही गिरनार परिक्रमेला सुरुवात केली.पहिला डोंगर गिरनार परिक्रमेचा सरळ रस्ता आहे पण जेवढी सरळ चढती आहे तेवढीच एकदम सरळ निसारडी उतरती आहे. ती आम्ही चढत उतरत पूर्ण केली त्याला पहिली घोडी असे म्हणतात …..(या परिक्रमे दरम्यान असे कळले की या परिक्रमेत 33 कोटी देव पण हि परिक्रमा या 5 दिवसात करत असतात… हि परिक्रमा कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा पर्यंत चालू असते त्यामुळे भरपूर लोकांची गर्दी असते) …. मग लागला दुसरा डोंगर म्हणजेच दुसरी घोडी हा रस्ता पूर्ण उभाच्या उभा डोंगर आहे आणि पूर्ण डोंगराला खडकाळ रस्ता आहे त्या खडकाळ रस्त्यातूनच वाट काढत काढत तो डोंगर चढावा लागतो. तसे आम्ही सगळे एकेक मागोमाग डोंगर चढत होतो तेव्हा साधारण उजाडायला लागले .सकाळचे सहा-सात वाजत आले आणि उजाडल्यामुळे बरीच गर्दी होऊ लागली होती त्या गर्दीतूनच वाट काढत आम्ही दुसरा डोंगर पूर्ण केला मग आला शेवटचा डोंगर म्हणजेच तिसरी घोडी जी पूर्ण पायऱ्यांची उतरती वाट आहे ज्याप्रमाणे आम्ही दुसरा डोंगर चढून गेलो त्याचप्रमाणे आता आम्ही पायऱ्यांनी तिसरा डोंगर उतरत होतो. भरपूर गर्दी होती पण त्यातूनच वाट काढत काढत आम्ही खाली पोहोचलो आणि आम्हाला एक कमान लागली तिथून आम्ही बाहेर पडलो. त्या कमानीतून जो रस्ता जातो तो सरळ बोरदेवी मंदिराकडे जातो पण आम्ही बोरदेवीच्या मंदिरांत न जाता आम्ही शेवटच्या आमच्या जाण्याच्या मार्गाकडे वळलो हा रस्ता गिरनार पायऱ्या चढायच्या त्या पहिल्या पायरीकडे जातो. हे शेवटचं अंतर संपता संपत नाही साधारण 15 किलोमीटरचा रस्ता असेल .आम्ही चालत होतो चालत होतो पण वाट काही संपत नव्हती….. एकदाची वाट संपली आणि फॉरेस्ट ची गेट लागली तिथून बाहेर पडल्यावरच गिरनार पायऱ्या चढायची जी पहिली पायरी आहे तिथे नतमस्तक होऊन आम्ही बाहेर पडलो तेव्हा साधारण दुपारचे तीन साडेतीन वाजत आले होते आम्ही तिथे नमस्कार करून आश्रमात परत आलो आंघोळ करून झोपून गेलो. रात्री जेवणाच्या वेळी आम्ही सगळे एकत्र जमलो त्यावेळी आम्हाला असे कळले की दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गुरुशिखर चढणार होतो त्यादिवशी पाऊस आहे (हवामान खात्याने तसे सांगितले आहे) पण आम्ही विचार केला की सकाळी नसेल पाऊस मग आपण जाऊ शकतो पण आम्ही सकाळी जेव्हा उठलो आणि नाश्त्याला गेलो तेव्हा दुर्गमल्हारच्या विवेक सरांनी आम्हाला सांगितले की गुरुशिखरावर खूप पाऊस पडतोय आणि भरपूर वारा असल्यामुळे रोपवे बंद झाले आहे आणि आमच्या ग्रुप मधल्या 80 जणांपैकी जास्तीत जास्त लोकांनी रोपवेचे तिकीट काढले होते त्यामुळे रोपवे बंद असल्यामुळे सगळ्यांचा हेरिमोड झाला . सगळे नाश्ता करून आपापल्या रूममध्ये जाऊन बसलो वाट पाहत होतो दुपार झाली पाऊस कमी झालेला पण वारा खूप होता त्यामुळे रोपवे पूर्ण दिवस बंद असेल असं कळवण्यात आले. मग आम्हाला आमच्या दुर्गा मल्हारच्या विवेक सरांनी सांगितले की आपण असं करू शकतो की ज्यांना गुरुशिखर दहा हजार पायऱ्या चढून जायच्या आणि उतरायच्या आहेत त्यांनी आपण दुपारी निघूया तीन वाजेपर्यंत आणि ज्यांना हे शक्य नाही त्यांनी बाराशे पायऱ्या पर्यंत जाऊन शंकर महाराजांचे छोटेसे मंदिर आहे तिथे आपण नमस्कार करून परत येऊ त्याप्रमाणे आम्ही दुपारी 3 वाजता जेवून गिरनार चढायचा पहिल्या पायरीजवळ लंबे हनुमान मंदिर आहे तिथे नमस्कार करून छोटीशी पुजा करून पायऱ्या चढायला सुरुवात केली .ज्यांना बाराशे पायऱ्या पर्यंत जाणे जमले त्यांनी तिथे नमस्कार करून परत आले आम्ही 35 जण पुढे जायला निघालो एक एक टप्पा पार करत आम्ही पुढे जात होतो 3000 पायऱ्यावर जैन मंदिर आहे तिथून पुढे गेलं की 5000 पायऱ्यांवर अंबाजी मातेचे मंदिर लागते तिथे नमस्कार करून आम्ही पुढे गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ आलो तिथे थोडा वेळ थांबून पुढे निघालो आम्ही साधारण रात्री दहा वाजता गुरुशिखरावर पोचलो तिथे काहीच गर्दी नव्हती कार्तिकी पौर्णिमेची रात्र होती खूप छान चांदणं पडलं होतं आधी आम्हाला धुक्यामुळे काही दिसलं नाही पण आम्ही जेव्हा गुरुशिखरावर पोचलो तेव्हा पूर्ण आभाळ प्रकाशाने झळाळून निघाले होते आम्ही चंद्राला नमस्कार केला व गुरुशिखरावर पादुका व दत्त महाराजांच दर्शन घेऊन खाली आलो खाली येऊन आम्ही कमंडलू तीर्थ आहे व धुनी आहे तिथे जाऊन नमस्कार केला तीर्थ प्राशन केलं आणि प्रसाद घेतला घरी न्यायचा पण प्रसाद घेऊन आम्ही साधारण अकरा वाजता पायऱ्या उतरायला सुरुवात केली आम्ही पहाटे तीन साडेतीनला पायऱ्या उतरून पूर्ण केल्या. खूप त्रास झाला उतरताना पण महाराजांनी हे दिव्य आमच्या कडून करून घेतले. आम्ही केव्हा चढून उतरलो हे काहीच कळले नाही. आम्ही साधारण साडेतीन-चार वाजता आमच्या आश्रमात पोचलो आंघोळ करून झोपी गेलो आणि केव्हा सकाळ झाली तेही कळले नाही. सकाळी सात वाजता उठून नाश्ता चहा झाला व दहा वाजता आम्ही राजकोट ला जायला निघालो राजकोटला जाऊन आम्ही तिथे सगळे एकत्र जेवण वगैरे केले सगळ्यांनी आपले परिक्रमा व गुरूषिखर चढताना आलेले अनुभव सांगितले दुपारी सगळ्यांसोबत जेवण करून आम्ही 2 वाजता अहमदाबादला बसने निघालो रात्री आम्ही आठ वाजता अहमदाबादला पोहोचलो तिथून आमची साधारण 1 वाजता ट्रेन होती तिथेच थांबून रात्री 1 वाजता ट्रेनमध्ये बसलो व आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो असा हा आमचा गिरनार परिक्रमा व गुरुशिखराचा अनुभव खूप छान होता सगळे सहकारी छान होते दुर्ग मल्हार ची टीम तर खूपच छान होती त्यांनी आम्हा सर्वांना खूप छान साथ दिली . त्यामुळे आमची ही परिक्रमा खूपच सुखकर सोपी व सरळ झाली …..सर्व दुर्ग मल्हार टीमला खूप खूप धन्यवाद…..जय गिरनारी