दुर्गमल्हार….🚩
नावात काय आहे? हा प्रश्न आता कालबाह्य ठरला आहे, खरंतर नावातच सगळं काही आहे असं म्हणण्याचे हे युग आहे.
जन्मापासून गिरी -दुर्गांशी नातं जोडलेल्या आम्ही गिरिजा दुर्गांची भटकंती करत असतोच.
मल्हाराशी ही आमचे कौटुंबिक नाते!त्याच्या दर्शनाविना तर आपले सहजीवनही सुरू होत नाही.
शिवाय मुसळधार बरसणाऱ्या सरींच्या साक्षीने गायला जाणारा मल्हार तर सर्वांच्या जवळचा आणि आवडीचा,अगदी गाणारा असो की ऐकणारा!
तर अशा या दुर्गमल्हार या नावाशी आपोआपच जवळीक साधली गेली.
आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या समुहांसोबत विविध ठिकाणी जाण्याचा योग आला होताच,मात्र नर्मदेची पवित्र उत्तरवाहिनी परिक्रमा घडवून आणण्यासाठी आमच्यापुरते बोलायचे झाले तर खुद्द मैय्याने दुर्गमल्हारला निवडले असावे!
हा आपापल्या श्रध्देचा भाग झाला अर्थात!
मात्र जगात कोणतीही गोष्ट उगाच होत नाही यावर माझा ठाम विश्वास!
अगदी या निमित्ताने एकत्र आलेल्या सर्व अनोळखी व्यक्तींच्या गाठीभेटी,देवाणघेवाण त्यातून काही क्षणापुरते का होईना निर्माण झालेले भावबंध आणि यातून पुढे होऊ घातलेले घट्ट नाते हे सर्व पूर्वनियोजित असते हे ही अर्थात माझे अनुभवाअंती निर्माण झालेले मत.
नर्मदामाईची असीम कृपा आणि दुर्गमल्हारचे निवांत(जे प्रारंभी आम्हा सतत धावणाऱ्या पुणे -मुंबईकरांना पटले नव्हते,मात्र नंतर तेच कसे योग्य होते हे ही जाणवले) आणि सुयोग्य नियोजन यामुळे नर्मदा परिक्रमा निर्विघ्नपणे पार पाडू शकली, यासाठी मी व्यक्तिशः दुर्गमल्हारची अतिशय ऋणी आहे शिवाय सोबत असणारे मार्गदर्शक श्री विजय सर,जयश्री भट मॅडम तसेच वयाने सर्वात लहान असूनही अतिशय समंजस असा किरण जाधव या तिघांचेही मनःपूर्वक आभार.दुर्गमल्हारचे सुकाणू ज्यांच्या हाती आहे ते श्री विवेक पाटील ज्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला नसला तरीही या तिघांना भेटून आणि त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता त्यांच्याही क्षमतांचा काहीसा अंदाज येतोच.असेच यापुढेही अशा पवित्र यात्रा आणि गिर्यारोहण करण्याचे योग आपणासमवेत येत राहोत!
तुम्हा सर्वांना पुढील उज्ज्वल वाटचालीस आभाळभरून शुभेच्छा.❤️
*साधना*
भायखळा,मुंबई.
