दुर्गमल्हार, माझ दुसरं कुटुंब…

DM_TRNSP_HD

मी स्वतः आधी बदलापूर येथील एका जुन्या क्लास मध्ये शिकवत होते, त्या क्लास शेजारीच दुर्ग मल्हार ट्रेक्स अँड टूर्स च ऑफिस होत. त्याच संपर्कातून दुर्ग मल्हार आयोजित रायगड पद्मदुरग या ट्रेक (२०१७) विषयी कळलं व शिवाजी महाराजांच्या घरी जायला मिळणार म्हणून मी आणि माझा भाऊ या ग्रुप ला जॉईन झालो.. हा माझा दुर्ग मल्हार बरोबरचा पहिला ट्रेक..उत्तम व्यवस्था, उत्तम जेवण आणि अगदी इत्यंभूत माहिती असणारे ट्रेक लीडर.. पहिलाच अनुभव अगदी छान होता.. विवेक सरांशी तशी तोंड ओळख क्लास शेजारीच असल्याने आधी पासून होती, ट्रेक मध्ये मात्र पूर्णपणे ओळख झाली..
२०१९ मध्ये काही कारणाने असलेला जॉब सोडून मी पुन्हा बदलापूर मधीलच कॉलेज मध्ये शिक्षक म्हणून लागले..या 2 वर्षात 2 ते 3 ट्रेक आई बाबांच्या 2 टूर असा दुर्ग मल्हार शी संपर्क वाढला होता..
अचानक 1 दिवस मला विवेक सरांनी मला ऑफिस मधे बोलवून विचारलं की दुर्ग मल्हार ऑफिस मधे as a टीम मेंबर म्हणून काम करणार का आणि तिथून सुरू झाला दुर्ग मल्हार बरोबरचा प्रवास… सुरुवातीला पार्ट टाइम असणारा जॉब हळूहळू full time कधी झाला कळलंच नाही..आणि अर्थात दुर्ग मल्हार ची सदस्य आणि गिरनार यात्रा केली नाही हे अशक्य..पूर्ण 1 वर्ष दुर्ग मल्हार ऑफिस मध्ये काम केल्या वर गिरनार चा योग आला आणि मग पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज च भासली नाही..त्या गिरनार नंतर किती गिरनार यात्रा केल्या माहीत नाही..माधवी ताई म्हणते मोजू नको करत रहा..हळूहळू स्वतंत्र टूर करण्याची जबाबदारी देखील विवेक सरांनी खांद्यावर टाकली..किती तरी 1 दिवसीय, अन्य राज्यातल्या टूर्स एकटीने टूर लीडर म्हणून केल्या..विवेक सरांनी दाखवलेला विश्वास आणि टाकलेली जवाबदारी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणु देत नाही.. या परिवारात अनेक माणसं अगदी घरच्यासारखी जोडली गेली..प्रथम विवेक सर, सोनाली ताई (mrs. Vivek patil), माधवी लोकरे ताई, आमचा किरण, माझ्या बरोबर ऑफिस मध्ये काम करणार स्टाफ सगळे कुटुंबाचा भाग झाले..ऑफिस तर दुसरं घर झालं..2019 ला सुरू झालेला हा प्रवास आज 5 वर्ष झाली असाच अविरत सुरू आहे आणि पुढे कायम राहील.. दुर्ग मल्हार ची पहिली ब्रांच विरार इथे सुरू केली आहे आणि ब्रांच हेड म्हणून सुद्धा काम बघते आहे..पण तरीही बदलापूर ऑफिस शी असलेलं नातं अजूनही तसच कायम आहे.. तिथलं काम सुद्धा मी विरार ला बसून करते..
दुर्ग मल्हार बरोबर केलेलं हे कॉन्ट्रॅक्ट non revocable terms वर आहे हे नक्की..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these