चारधाम यात्रा

chandrashila.jpg

दुर्ग मल्हारची चार धाम यात्रा. अनेक यात्रांसारखी आध्यात्मिक सहल नव्हे यात्राच. पण शारीरिक आणि मानसिक क्षमतांची कसोटी पाहणारी .
आपणच जाऊन रेकी करून येऊ म्हणत चारधाम चा प्लॅन ठरला. आणि एकेक करत नऊ जणांची टीम तयार झाली. मिळेल त्या बेसिक facilities मध्ये ही यात्रा करावी असे ठरले.
नव रत्नांची ही टीम . बरेचसे एकमेकांना ओळखणारे. त्यात दोन नवीन तरुणी सामील झाल्या.
पहिले रत्न म्हणजे अखंड बडबड करणारी, उत्साही अस्मिता. केदारनाथ करायची प्रचंड इच्छाशक्ती घेऊन आलेली. यमनोत्री करताना तिची हालत बघून ही नक्की घोडा करून केदारनाथ गाठेल असे वाटले होते. पण पठ्ठी ने जिद्दीने एकटीने रात्रीच्या काळोखात केदारनाथ गाठलं. तिच्या जिद्दीला सलाम.
दुसरे अनोळखी रत्न म्हणजे निशा. फोटो, विशेषतः सेल्फिची खूप आवड असलेली निशा पहिल्यांदा खूप शांत वाटत होती. लाजरी बुजरी वाटत असलेली निशा यमनोत्री ला मस्त घोडेवला, चालणाऱ्या पब्लिक ला झापत असलेलं बघून कळल की बाईत जाम confidence आहे. आपला उगीच गैरसमज झाला होता. अंधारात अस्मिताला तुंग नाथ वरून तासाभरात खाली उत्र्वण्यात हीचा मोलाचा वाटा होता.
पुढचं रत्न म्हणजे जयू. संतूर मॉम. एक उत्साही बागडणार फुलपाखरु च. हिच्या सोबत राहिले की तुमचा मूड ठीक झालाच पाहिजे. मस्त stamina त्यामुळे चालताना पुढे.
पुढचं रत्न म्हणजे Atharva. ग्रुप मधला सगळ्यात छोटा मुलगा. पण मदतीला सगळ्यात पुढे. प्रेमाने सगळ्यांना मसाज करून द्यायला सदैव तत्पर.
पुढचं रत्न किरण. जबरदस्त stamina. विवेक चा उजवा हात. सर्व कामात पुढे. दिसताना दिसतो शांत , बोलतो कमी . केदारनाथ च्या दर्शनाला ८,९ तास रांग लावणारा असा देवभोळा किरण.
पुढचं रत्न निखिल. वयाने लहान पण Photography मधला बाप माणूस. निसर्गाचे आणि माणसांचे मूड्स टीपायचा ह्याचा छंद. त्या छंदा पायी ताप येऊन गेलेला असतानाही केदारनाथ, तुंग नाथ करणारा, मदतीला धावणारा असा हा निखिल.
पुढचं रत्न म्हणजे तन्मेश. मितभाषी, शांत. चांगला फिटनेस असलेला . इतके ट्रेक ह्याच्या सोबत होऊन पण मला अजून ही न कललेला . 🙈
पुढचं रत्न म्हणजे विवेक . या यात्रेची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर समर्थ पणे वाहून नेणारा. अगदी यात्रेच नियोजन असेल की flight चे बुकिंग असो, इथे प्रत्येकाची काळजी असो, इथल्या व्यवस्था बघणे असो. जातीने सर्वात लक्ष घालणारा आणि कधी कधी स्वतः बरोबर दुसऱ्यांना बुरांश ज्यूस प्यायची गरज निर्माण करणारा 😜, चांगला टूर लीडर, चांगला माणूस. ह्याला नुसते रत्न म्हणावे की रत्नराज हे तुम्हीच ठरवा.
अशी सर्व विविध स्वभावाची रत्न घेऊन दुर्ग मल्हार ने आयोजित केलेली चारधाम यात्रा सर्वांच्या सहकार्यामुळे आज सुफळ संपन्न झाली.  🙏🙏🙏🙏

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these