गुरुपौर्णिमा … .. अनोखी गिरनार यात्रा.
गुरू शिष्याचे मंदिर असलेली आणि भगवान दत्तात्रयांचे चिरंतन वास्त्यव्याने पुनीत झालेली तपोभूमी म्हणजे गिरनार ! गुरुपौर्णिमा आणि गिरनार दर्शन म्हणजे दुग्ध शर्करा योग !
“निघालो घेऊन दत्ताची **पालखी” म्हणणाऱ्या दुर्ग मल्हार मुळे हा योग जुळून. आला.
तुफान पाऊस, विस्कळीत रेल्वे वाहतूक, सर्वत्र पाणी असे असतानाही आपण सर्व गिरनार ला वेळेवर व सुखरूप पोचलो. समोरचा गिरनार पर्वत अर्धाअधिक ढगात च लपला होता. पण गुरू कृपेने रोप वे सुरू झाला होता.
गिरनार म्हणजे प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक कसोटीच ! प्रत्येक वेळी गिरनार आपल्याला वेगळाच भासतो, वेगळीच अनुभुती देतो फक्त मन:चक्षु उघडे हवेत.
ढगांची शाल पांघरलेल्या या रैरावत पर्वतावर चढताना १५-२० पायऱ्यांच्या पलीकडले काही दिसत ही नव्हते. अशा परिस्थितीत मार्ग दाखवणारे श्री विवेक सर, मध्ये आध्ये चालणारे त्यांचे सहकारी आणि सर्वात शेवटी सर्वांना प्रोत्साहित करणारी ‘ मी*तुमच्या बरोबर आहे ‘ म्हणणारी माधवी ताई.
‘ शोधिशी मानवा राउळीमंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी ‘
अंत: करणाचे विशाल नेत्र उघडले तर दुर्ग मल्हारच्या या टीम मध्येच मला साक्षात दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. ‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ‘ अशा अभय मंत्राच्या पूर्ततेची
प्रचिती मला श्री विवेक सर आणि माधवी ताई यांच्या वागण्यातून आली. ५१ दत्त भक्तांना गुरुशिखरावरील मनोहारी चरण पादुकांचे दर्शन घडवून सुखरूप मुक्कामी आणणाऱ्या दुर्ग मल्हारच्या सर्वांवर श्रीदत्तगुरु ची किती ‘ असीम*कृपा आहे याचा प्रत्यय आला, अनुभूती आली.
ऐन वेळी परतीची रद्द झालेली गाडी, अल्पावधीतच नवीन रिझर्व्हेशन स् करून केलेला सुखरूप प्रवास , सारेच अकलनीय !
दुर्ग मल्हार म्हणजे उत्तम व्यवस्थापन, नियोजन, माणुसकी, आत्मीयता आणि सर्वांची काळजी घेत केलेले आयोजन !
नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी यांसोबत तर आपला वाढदिवस नेहमीच साजरा होतो. पण असा वाढदिवस…
‘ न भूतो, न भविष्यती*
तिघांचा वाढदिवस एकच दिवशी हा एक योगायोगच.
अहमदाबाद स्टेशनचा विशाल प्लॅटफॉर्म, मागेपुढे करोडोंच्या मेल एक्स्प्रेस, प्राप्त परिस्थितीत प्रेमाने डेकोरेट केलेला केक आणि अल्प परिचित गिरनारीच्या समवेत पहाटे ३-३० वाजता ब्राम्ह मुहूर्तावर श्री विवेक सरांनी सजगतेने साजरा केलेला वाढदिवसा चा सोहळा ! सारेच अनपेक्षित, अनमोल आणि अविस्मणीय ! शब्दातीत न करता येणारे.
विवेक सर म्हणजे ..
” मा फलेशु कदाचन ”
म्हणत कर्माच्या अखंड प्रवाहात स्वतःला झोकून देणारे , दत्तकृपा असलेले कर्मयोगी !
जय गिरनारी ! 🙏🏻