June 2019 मध्ये आईच्या सांगण्यावरून गिरनार यात्रा “दुर्गमल्हार” बरोबर करण्याचा निर्णय झाला….. दुर्गमल्हार बरोबरची ही पहिली वहिली यात्रा… मनात अनेक शंका होत्या, पण जसं प्रवास सुरू झाला तसतसं लक्षात येऊ लागलं की दुर्गमल्हार च management खूप छान आहे..
गुरुशिखर चढताना दुर्गमल्हारचे प्रोप्रायटर विवेक पाटील सर आणि त्यांची टीम हे सगळ्यांची खूप काळजी घेत होते.. कोणाला काही त्रास तर होत नाही ना अगदी प्रत्येकाची विचारपूस करत होते..
एकंदरीत लक्षात येऊ लागलं की Durgmalhar Treks & Tours ही खूप छान टूर कंपनी आहे…
नंतर २ वर्ष कुठे जायचा योगच आला नाही..
अश्यातच Durgmalhar Treks & Tours नी आसाम मेघालय टूर declare केली. आणि मी लगेच ह्या टूर साठी नाव दिलं. पण त्याच वेळीस covid मुळे दोन वेळा ही टूर postponed करत finally २०२१ मध्ये झाली.
दिनांक १९ एप्रिल ते २६ एप्रिल २०२१,आसाम मेघालय टूर ला गेले होते. अविस्मरणीय अनुभव होता तो. कोविड च्या काळात आम्ही टूर ला गेलेलो. अनेक अडचणी, टेन्शन क्षणो क्षणी येत होते… पण त्या सगळ्या अडचणींवर विवेक सरांच्या जिद्दीने यशस्वी मात करत आम्ही ही सहल पूर्ण केली.
विवेक सरांनी सगळ्या सोयी खूप छान केल्या होत्या.. आम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही.. सगळे हॉटेल्स, राहण्याची सोय उत्तम होती, आणि Durgmalhar Treks and Tours बरोबर जाताना ह्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा अनुभव आला.
आता मात्र मनाशी ठरवल की कुठेही टूर ला जायचं असेल तर फक्त आणि फक्त Durgmalhar Treks and Tours बरोबरच….
मग काय October 2021मध्ये Himalayan Trek “हर की दुन” declare झाल्या झाल्या जायचं ठरवल. आयुष्यातला पहिला ट्रेक तो सुद्धा डायरेक्ट Himalayan Trek….. पण ह्या वेळीस मात्र कुठल्याच प्रकारचं टेन्शन न्हवत कारण विवेक सर वेळोवेळी मीटिंग घेऊन ट्रेक ची तयारी कशी करायची ह्याचं मार्गदर्शन देत होते… मला कुठलाही डाऊट आला की मी लगेच विवेक सरांना कॉल करायचे आणि ते माझा डाऊट clear करायचे.
आम्ही गेलो होते “हर की दुन” ट्रेक करायला पण आम्हाला तो ट्रेक करण्याची परवानगी मिळाली नाही कारण तिथे काही casualties झाल्या होत्या..म्हणून तिकडचे छोटे छोटे ट्रेक करण्यात आमचे २ दिवस गेले आणि आम्हाला “हर की दुन” नाही पण “केदारकंठा” ट्रेक करायची परवानगी मिळाली…
५ दिवसांचा ट्रेक आम्ही अडीच दिवसात पूर्ण केला… ह्या ट्रेकच्या वेळीस दूसऱ्या दिवशी Altitude Sickness मुळे मला खूप त्रास झाला.. इतका की मी घरी परत येईन की नाही याची मलाच खात्री न्हवती. मी ट्रेक पूर्ण करणार नाही आणि इथेच आराम करेन असं विवेक सरांना सांगितलं … ह्या वेळीस विवेक सर आणि माधवी ताई ने माझी खूप काळजी घेतली…. जरा बरं वाटायला लागल्यावर मी पुन्हा ट्रेक पूर्ण करण्याच्या जिद्दीने चालायला लागले आणि finally मी समिट पूर्ण केलं… ह्याचा आनंद मला जितका होता तितकाच विवेक सर, माधवी ताई आणि बाकी ट्रेक मेंबर्सना होता….
पहील्या वहिल्या Himalayan Trek चा इतका वाईट अनुभव आल्या नंतर आयुष्यात परत कधी Himalayan Trek करणार नाही अशी खूण गाठ मनाशी बांधली….
पण पहाडो की बात ही कूछ अलग हैं म्हणतात ते काय चूक नाही…
मे २०२२ मध्ये “हर की दुन” trek declare झाला…आणि नाही म्हणता म्हणता मी ह्या trek ला जायचं ठरवल… सहजच म्हणून मी विवेक सरांना विचारलं की माझ्या लेकीला आणू ??
(त्यावेळी माझी लेक ५ वर्षांची होती).. सर हो म्हणाले… पण मागचा ट्रेकचा अनुभव लक्षात होता … सर म्हणाले काही होणार तिला… आण तुझ्या लेकीला सोबत… तिने आणि मी दोघींनी समिट (ट्रेक पूर्ण केला)केलं.. तो क्षण अविस्मरणीय होता……
२०२२ मध्ये एक दोन नाही तब्बल तीन वेळा गिरनार यात्रेला गेले अर्थातच Durgmalhar Treks & Tours बरोबरच…
२०२३ मध्ये धमाल मस्ती करत चारधाम यात्रा रेकी म्हणून केली अगदी basic facilities मध्ये पण त्या सुद्धा उत्तम होत्या… हंपी बदामी टूर केली… तिथे पण खूप मज्जा आली…
२०२३ च्या गिरनार परिक्रमा मध्ये पहिल्यांदाच volunteer म्हणून काम केलं… खूप मज्जा आली ते करताना… Volunteer झाले तेव्हा समजल की विवेक सर त्यांच्या clients ना त्रास होऊ नये म्हणून छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टीं पर्यंत किती विचार करतात… As a client म्हणून मी जेव्हा Durgmalhar Treks & Tours बरोबर जायचे तेव्हा ज्या ज्या सोई इतक्या सहज पणे उपलब्ध आहेत त्या मागे किती planning आणि management असतं ह्याचा अंदाज पण न्हवता मला….
मे २०२४ मध्ये Himachal Pradesh tour ची volunteer म्हणून परत एकदा काम करायला मिळालं…. अमृतसर, डलहौसी, Dharamshala आणि मनाली अशी टूर होती…
Golden temple, Jallianwala Bagh, Atari Border chi parade हे सगळ फक्त tv वर बघितलं होत…. Jallianwala Bagh Massacre बद्दल जेव्हा आमचा गाईड सांगत होता तेव्हा डोळ्यात अश्रू आले… किती ती क्रूरता आणि जीव मुठीत घेऊन मिळेल त्या दिशेने पळणारे निष्पाप भारतीय लोकं डोळ्या समोर यायला लागली आणि मन अस्वस्थ झालं…
पण Atari Border वरची parade बघून भारतीय असल्याचा सार्थ अभिमान वाटला….
Dalhousie स्थित “Mini Switzerland” म्हणजेच Khajjiar खूप सुंदर होत…….
मनालीला केलेलं paraglyading was the cherry on the top…. आशिया खंडातील second highest paraglyading point aahe हे…. तो अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे….
एकंदरीतच हिमाचल टूर उतम्म झाली……
अशा प्रकारे Durgmalhar Treks & Tours बरोबर attachment वाढत गेली… आणि एके दिवशी सर मला म्हणाले अंबरनाथला आपलं डेस्क सुरू कर…… आणि मी सुध्दा “पडत्या फळाची आज्ञा” मान्य केली… आणि अलीकडेच अंबरनाथला Durgmalhar Treks & Tours चा desk सुरू केलाय….
दत्त प्रभूंची कृपा दृष्टी आहेच… जय गिरनारी…….