काय वर्णू दुर्ग मल्हार ने घडवलेला भिवगड…

rutuja phadke

काय वर्णू दुर्ग मल्हार ने घडवलेला भिवगड
मनाने सोबत केले त्याने हलके हे शरीर जड…(अजून वजन केलेलं नाही😝)

आयुष्यातला सगळ्यात पहिला trek होता त्यामुळे प्रचंड उत्साहात तयारी चालू होती…आपल्याला हव्या असतील ना तर आपण सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा adjust करतो…तसंच माझंही झालं. Adjust होणारच नाहीत असं वाटलेल्या गोष्टी सुद्धा आपणच रुळावर आल्या…बॅग भरली गेली. एका दिवसासाठी एवढी बॅग घेऊन कुठे चालली आहेस असं विचारल्यावर सगळ्या उत्साह डोळ्यात आणून बाबांना मी सांगितलं trek ला चालले आहे…बाबांचेही फक्त ‘वाह!!! मज्जा करून ये’ हे सांगणारे डोळे मला चटकन खूप energy देऊन गेले…शनिवारी घरापासून प्रज्ञाच्या घरापर्यंतचा प्रवास चालू झाला तो आशाताईंच्या ‘केळीचे सुकले बाग’ या गाण्यापासून…गाण्यात इतकी गुंग झाले होते की हा trek गाण्याचा मतितार्थ इतकं सुंदर निसर्गाच्या दर्शनाने पुसून टाकणार आहे हे तेव्हा माहीतच नव्हतं…!!
कर्जतला उतरून टमटम चा प्रवास… आणि आम्हला नव्याने झालेला ‘ज्योतिषशास्त्राचा परिचय…अहाहा!!! तिथेच सूर जुळले असं वाटलं…पहिल्यांदा भेटतो आहोत असं वाटलंच नाही…
Trek सुरू झाला नाश्त्या पासून…वाह!!! Tomoto ची चटणी…😋😋😋
इथेच कळलं होतं…दुर्ग मल्हारला ‘sales Value’ पेक्षा ‘human value’ खरी वाटते…(नाहीतर tomoto ला सोन्याची किंमत असतानाही पोटभर खायला कोण देईल नाही का?)
मग सुरू झाला ‘तो’ प्रवास …जो आज पहिल्यांदा ‘असा’ होणार होता..चढण्या आधी जेव्हा ‘हे बघा इथे जायचंय, या उंचीवर’ असं सांगितलं तेव्हा ‘काश दहावी, बारावी , पदवी सगळीकडेच एवढ्या उंचीचा अभ्यास केला असता तर आज आपली उंची एवढी असती असं मनोमन जाणवलं…🙈असो…
निसर्ग इतक्या जवळून पहिल्यांदा बघितला…निरसर्गाने चटकेही दिले आणि आम्ही थकलो आहोत हे कळल्यावर पावसाच्या सरींनी चिंब केलं…
माणसाने कितीही ठरवलं की आपण फक्त स्वतःचं बघायचं… तरी trek असं ठिकाण आहे की जिथे आपण पटापट पुढे जाऊन पण सगळे आले आहेत ना? हे बघायला आपली मान मागे हळूच वळते…Trek हा स्वतःचा स्वतःला घ्यायचा असलेला शोध आहे. असंख्य ठिकाणं अशी येतात की आपण हरलो असं वाटत असतं; पण आपण पडलो तरी आपल्याला पकडायला कुणीतरी आहे ही भावनाच मनाला उभारी देऊन जाते आणि खरंच आपल्याला पुढे न्यायला असंख्य हात पुढे दिसायला लागतात…
कधीच विसरणार नाही हा माझा पहिला वाहिला trek…’विवेकी guidance’ ही लक्षात राहील आणि ‘रसिकाधार’ सुद्धा…😍😍…आणि मला वर चढवणारे हात, last but not the least…trek च्या मिसळीवर झणझणीत तर्री…मंदार भावे सर…
लय मज्जा आली राव…
धन्यवाद
-ऋतुजा फडके, दहिसर मुंबई..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these