कविता माझ्या मनातली – दुर्ग मल्हार

॥ कविता माझ्या मनातली – दुर्ग मल्हार विवेक पाटील॥

दु र्गारोहण करण्या गिरनारी निघालो
घेण्या दत्तावधूतांचे दर्शन
दु र्ग म गिरीशिखर गिरनार जे पावन
साक्षात दत्तगुरुंचे पवित्र निवासस्थान
म न आनंदे भारावलेले अनुभवण्या
तेथले परमपवित्र वातावरण
उ ल्हा स यात्रेतला वाढविण्या होते
सोबतीस विविध ठिकाणाचे स्नेहीजन
र मता गप्पागोष्टी भेटीगाठीत जाहले
एकमेकांच्या स्नेहल परिचयाचे प्रयोजन
विवेक मनी बाळगून संयमाचा
होतसे यात्रेचे कष्टप्रद नियोजन
शुभारंभी घेण्या श्रीसोमनाथांचें दर्शन
सात्विक न्याहरी करून झाले प्रस्थान
पा हण्या अनुभवण्या आपल्या संस्कृती दिव्य वैभव
स्थल प्रदर्शनार्थ होते उत्तम वाहन नियोजन
टी कवण्या संस्कृतीच्या महत्तेचा अभिमान
वदले विवेक जाहले सोमनाथ पुनर्निर्माण
ल क्षद्विप बाणस्तंभ बाणगंगा भालकातीर्थ
गोलकधाम त्रिवेणी संगम यथार्थ जाहले
सोमवारी जय गिरीनारी
दर्शना दत्तावधूतांचे दरबारी
मंगळवारी द्वारका द्वारकाबेट
शिवदर्शना ज्योतिर्लिंग नागेश्वरी
बुधवारी परतीचा प्रवास
मुकेल प्रियजनांचा सहवास
परि फोटोग्राफीतून बद्ध झालेल्या आठवणींतून
हे आनंदक्षण दीर्घकाळ राहतील स्मरणात
जय गिरनारी
जय रामकृष्ण हरी ।

यहा कहानी में अचानक आया व्टिस्ट

समजला दैवे अचानक कोंडला
द्वारकाधीश लॉकडाऊन च्या कारागृहात,
द्वारका द्वारकाबेट नागेश्वरांच्या
दर्शनाचा रद्द केला योजला बेत………

हर्षदा यी विवेकाने तेव्हा
संभ्रमे गोंधळू न देता चित्त,
माधवी च्या माधवाचा त्यागला
सकलमते स्थलदर्शनाचा हट्ट………

अभयारण्यी व्याघ्र-वन्यजीव दर्शना दुर्गमल्हारकर
निघाले देवलीया गीर जंगलात
समस्त स्त्री मन उल्हासे खुलून होत लांडोर
आनंदपिसारा फुलवत नाचला पुरुषांचा मनमोर त्यांसवे उत्साहात

परिस्थितीवर कल्पकतेने करता मात
प्रयासात विजया स मिळाली प्रयत्नांची साथ
वय विसरून सकल हुंदडले रानावनात
गरमागरम न्याहरी समोर आली ताटात………

माधोपूर समुद्र किनाऱ्यावर रमता मन
वय विसरून हर्षोल्ल्हासे झाले पोर,
सांदिपनी आश्रम जांबुवंत गुंफा दर्शन
मन अध्यात्मानंदे जाहले भावविभोर………

भावला इथला माणूसकीचा स्नेहप्रद व्यवहार
आपुलकी जोपासणाऱ्या स्नेहबंधाचा आविष्कार,
नावलौकिक होवो यांचा सात समुद्रापार
जय गिरनार जय दत्त गुरू जय दुर्गमल्हार………

मनोगत,
सधन, श्रीमंत, तालेवार, मालदार, दणकट, सशक्त यांच्या दिमतीला, खुशामतीला अनेकजण आतुरलेले असतात. ही सर्व मंडळी दिखाव्यात देवपण शोधत आयुष्यभर वणवणत राहतात….
पण अडल्या, नडल्याच्या व्यापलेल्या, त्रासलेल्यांच्या पाठीशी जे वेळ-प्रसंगी आश्वासक होऊन ठाम उभे राहतात, त्यांना अनेक रुपात वेळोवेळी देव भेटत राहतो.

दुर्ग मल्हारकर स्नेहीजनांच्या कालच्या स्वयं स्फुर्त मनोगतातून आणि आयुष्यातल्या या पूर्वीच्या अनेक चांगल्या ठिकाण, प्रसंग, घटनांच्या प्रांजळ अनुभवातून हेच सत्य उमगलं.

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

अविनाश भालेराव, बदलापूर(पूर्व)

संवाद – ९८६७९ ६८३११ / व्हाट्सएप – ९७६९३ ९७४१४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these