❗❗ जय गिरनारी❗❗
*एकविश्वासाचं नाव आणि गाव म्हणजे दुर्ग मल्हार ट्रेक्स आणि टूर्स…*
दुर्ग मल्हार ट्रेक्स आणि टूर्स ही बदलापूर येथील संस्था आणि या संस्थेचे सर्वेसर्वा श्रीयुत विवेक पाटील सर म्हणजे खरोखर उत्तम आनंद आणि अनुभव देणारी पर्यटन संस्था.
कुटुंब प्रमुख *श्रीयुत विवेक पाटील सर**म्हणजे उत्तम आयोजक .स्वतः यात्रेकरुन बरोबर उपस्थित असणारे संचालक ,अत्यंत मनमिळावू, शांत पणे समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घेणारे आणि तितक्याच शांतपणे समजावून सांगणारे ,सर्वांची आस्थेने विचारपूस करून काळजी घेणारे व विशेष वैशिष्ट्य म्हणजे निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी व *आपला प्रत्येक विचार आचार हा राष्ट्राच्या भल्यासाठी, कल्याणासाठी असला पाहिजे* या धारणेने जगणारे राष्ट्राचे उत्तम नागरिक आहेत असे मला 15 जानेवारी 2022 ते 19 जानेवारी 2022 या कालखंडात केलेल्या गिरनार, सोरटी सोमनाथ आणि इतर स्थलदर्शन या यात्रेत अनुभवास आले.
दुर्ग मल्हार ने आम्हाला उत्तम सेवा दिली. संपूर्ण यात्रेत उत्कृष्ट जेवण व इतर भरपूर खाद्यपदार्थ देऊन तृप्त केले. छान व्यवस्थापन होते. आणि महत्वाचे म्हणजे गिरनार सारख्या अजून काही ठिकाणी तरुणांसह वयस्कर लोकांना *कल्पनेपलीकडचा पारमार्थिक आनंद आणि समाधान मिळवून देणार एक विश्वासाचं नाव आणि गाव म्हणजे फक्त आणि फक्त दुर्ग मल्हार व विवेक पाटील सर.*
गिरनार यात्रेचा हा तीन दिवसाचा काळ कसा गेला काही समजलेच नाही. यात्रेतील सर्व सदस्य कधी एकमेकात मिसळून आपलेसे झाले हेही समजले नाही. त्यामुळे गिरनार चढणे सहज शक्य झाले .अर्थातच दत्त महाराजांची कृपा म्हणूनच हे सगळे जुळून आले .
चातक पक्षी जशी पावसाच्या थेंबाची प्रतीक्षा करतो त्याप्रमाणेच आम्हीही अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि अथक सायासाने जेव्हा दत्तगुरुंच्या पादुकांचे दर्शन घेतले तो क्षण म्हणजे अविस्मरणीय क्षण .डोळ्यात आनंदाश्रू .महाराजांनी आपल्याला इथ पर्यंत आणले, जीवनाचे सार्थक झाले हाच विचार फक्त मनात आला. या आठवणी सतत आमच्या मनात रुंजी घालत राहणार आहेत. गुरूंच्या पादुकांचे दर्शन आणि मी या मधील सेतूचे काम करणारे श्री विवेक पाटील सर आणि त्यांचे सहकारी सौ माधुरी ताई ,हर्षदा ताई ,विजय दादा आणि कैलास दादा यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले. तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारी आपली *दुर्ग मल्हार* संस्था भावी काळामध्ये खूप मोठी होवो.
*यशवंत होवो!! जयवंत होवो!! किर्तीवंत होवो!!*
यासाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद.
*सौ स्वाती संतोष नाईक*
*डोंबिवली*