दुर्गमल्हार टीम सोबत आमचा हा पहिलाच ट्रेक..
खूप चांगला अनुभव आणि आठवण सोबत घेऊन आज घरी परतलो..
सुंदर ऐतिहासिक ठिकाणांची निवड, वेळेचं नीटनेटकं नियोजन, खाण्यापिण्याची व्यवस्था, लहान मुलं, महिला वर्ग हयांची घेतलेली विषेश काळजी, राहण्याची सोय, आकाश दर्शन, ह्या सगळ्याच गोष्टींचं व्यवस्थापन छान केलं होतं..
पण विषेश कौतुक ह्याचं कि प्रत्येक व्यक्ती कडे जातीने लक्ष देणं, त्याच्यामनातील भिती दूर करून त्याचा आत्मविश्वास वाढविणं, उत्साह वाढविणं, आणखी थोडसं, आणखी थोडसं, आलंच असं म्हणंत समोरच्याची उमेद शेवटपर्यंत कायम ठेवणं..
कौतुकास्पद आहे..
पुस्तकात इतिहास वाचला होता.. पण ह्या ट्रेकच्या निमित्ताने इतिहासाच्या आणखी जवळ गेल्यासारखं वाटलं..
चावंड गडावर आई पोहचल्यावर तिचं टाळ्या वाजवून सगळ्यांनी केलेलं कौतुक कायम स्मरणात राहील..😊
लवकरच भेटू अशी आशा ठेवते..- डॉ. सोनाली कांबळे.