आसाम मेघालय एक यशस्वी सहल!

IMG_20210421_1234101-4.jpgIMG-20210423-WA0019-3.jpgIMG-20210422-WA0302-2.jpgIMG-20210425-WA0121-1.jpgIMG-20210422-WA0244-0.jpg

‘आसाम मेघालय’ निसर्ग सौदर्याचे वरदान लाभलेली दोन राज्ये. ब्रह्मपुत्रा नदीच्या जलाने सुजलाम् सुफलाम् झालेला भूप्रदेश.
ओद्योगिक प्रगती पासून वंचित, आर्थिक दृष्ट्या मागासल अशा आपल्याच देशबांधव ची जीवनशैली, राहणीमान,त्यांची संस्कृती यांचा जवळून परिचय व्हावा आणि प्रदूषण विरहित निसर्गाचा आस्वाद घेता यावा या संकलपनेतून श्री विवेक सरांनी – दुर्ग मल्हार नी आयोजित केलेली ही सहल !

गौहाती एअरपोर्ट व मेघालय प्रवेश सीमेवरील अडथळे पार करत मेघालयात प्रवेश केला. प्रथम पहिले ते ” उमियन लेक”. नयनरम्य परिसर, विस्तीर्ण, शांत नितळ पाणी आणि सूर्यास्ता समयी त्यात प्रतिबिंबित होणारे सूर्य बिंब बघताना मन मोहून गेले. दिवसभराचा प्रवासाचा शीण ही गेला.

‘ मेघ + आलंय – मेघालय ‘ हे नाव सार्थ करणारा पाऊस चेरापुंजी त अनुभवला. अवघ्या काही मिनिटांत नभ मेघांनी आक्रमिले ….
आणि वारा,वीज,पाऊस यांचं रौद्र रूप ही निसर्गाने घडवले. मेघालय म्हणजे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण राज्य. डोंगर, दर्या, गवताळ प्रदेश यांनी युक्त असलेल्या मेघालयात अनेक प्रकारचे नयनरम्य धबधबे पहिले. प्रत्येकाचे सौंदर्य वेगळे. काही जवळून काही लांबून. शक्य असलेलं सौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न ही केला. उंचावरून कोसळणारे – झोकून देणारे प्रपात खूप काही जीवनमूल्ये शिकवून गेले.

निसर्ग निर्मित Mawsmai Caves म्हणजे एक अदभुत नजारा, आणि त्यातून केलेली वाटचाल म्हणजे एक धाडसी सफर !
Maulynnong Village – आशियातील सर्वात स्वच्छ गाव ! पाहताना त्या लोकांचा देशाचा अभिमान वाटला. छोटेखानी पण टुमदार घरे, सभोवती झाडांचं कुंपण, ब हरलेली फुल झाडे पण कुठेही पालापाचोळा नाही. शांत, स्वच्छ परिसर मन मोहून टाकत होता.
निसर्गाची किमया असलेला ” लिव्हिंग रू ट ब्रीज” आणि ” क्रिस्टल क्लीन वॉटर रिव्हर ” !
ब्रीज वरून केलेली वाटचाल, आणि नदीचा तळ व आजूबाजूचे खडकांचे सौंदर्य निरखत केलेली बोटिंग केवळ अविस्मरणी य !
‘ डवकी’ येथिल बांगला देश बॉर्डर ही जवळून पहिली.

चहाचे मळे, बांबूच्या कलात्मक वस्तू, आणि दुकान व व्यवहार सांभाळणाऱ्या रेखीव सुंदर स्त्रिया ! हे तेथील वेगळेच वैशिष्ट्य !
आसाम – गौहति मधील म्युझियम बघताना आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश इ. मधिल संस्कृती ची ओळख ही झाली,. आणि मुख्य म्हणजे ” सांची पत ” मध्ये लिहिलेली ” मनू स्क्रिप्ट “. पहिली जी फारच दुर्लभ !

वशिठ्य मंदिर व ५१ शक्ती पीठांपैकी ५१ वे असलेले शक्ती पीठ ‘ कामाख्या देवी ‘ मंदिर यांचेही दर्शन घेतले.

काझिरंगा मधील अभयारण्य खऱ्या अर्थाने वन्य प्राणी व निसर्ग यांची रक्षक अरण्ये आहेत. हत्तीचे कळप, गेंडे, हरणे यांचा मुक्त संचार असलेल्या अभयारण्यातील जिप्सी व हत्ती वरील सफारी म्हणजे एक वेगळाच आनंद व अनुभव !

करोनाचे विषण थैमान देशात चालू असताना ‘ भय अजुनी संपत नाही ‘ असे म्हणत अनेक अडचणी वर मात करून श्री. विवेक सरांनी तेथे जाण्याची आपली जिद्द आपल्या दुर्दम्य आशावादने ध्येयाने पूर्ण करून दाखवली हे फार कौतुकास्पदच !
त्यांच्या या धाडसाला अप्रत्यक्ष पणे साथ देणारे त्यांचे मित्र श्री जयेश व सहकारी हर्षदा यांचाही अनमोल वाटा आहेच.
सहलीत वेळोवेळी श्री विवेक सरांना सहाय्यभूत ठरलेले श्री कामत काका, सौ सुचिता, सौ जयश्री यांचाही या यशस्वी सहलीत वाटा आहेच.
प्रदूषण विरहित निसर्गाच्या सानिध्यातील सहलीचा सर्वांनीच खेळीमेळीच्या वातावरणात मनसोक्त आनंद लुटला.

एप्रिल २०२० मध्ये होणारी सहल अनेक अडथळे पार करत एप्रिल २०२१ मध्ये ” सुफळ संपूर्ण ” झाली.

” मनी आणावे ते होते,
विघ्न अवघेचि नसोनी जाते
कृपा केली या रघुनाथे,
प्रचिती येते ll”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these