“अशक्य ही शक्य करतील स्वामी” हे अगदी खरं आहे..याची प्रचीती आली.
स्वप्नातही विचार केला नव्हता की मी गिरनार पायी करू शकते…
संगत माणसाला खूप काही करायला शिकवते ,अस म्हणतात…याच योगाच्या सगे सोबती मुळे ही यात्रा घडून आली..आपटे सरांनी गिरनार बद्दल सांगितले ..आणि योगा क्लास ला चर्चा सुरू झाली…आणि confirm झाले…कोणी building च्या lift मध्ये जाणे बंद केले…
चढून जाणे सुरू केले(गिरनार चढायचा ना)
उपवन ला जाऊन येऊर चा डोंगर चढणे सुरू केले(गिरनार चढायचा ना)
Knee cap.. स्वेटर टोपी… सगळं शोधणं सुरू(गिरनार चढायचा ना)
अस सगळं करत तो दिवस आला ..
योगा class ची 15 जणाची टीम निघाली गिरनार chya दिशेने.
दुर्ग मल्हार च्या माधवी ताई भेटल्या…किरण भेटला.. गिरनार chya दिशेने कूच केले .
ट्रेन मध्ये गप्पा चा फड रंगला…आणि 15 तारखेला राजकोट ला दाखल झालो…बायकांचे प्रमाण जास्त..”बायका तिथे शॉपिंग” आलेच.
सगळे शिळे बाशी हिरो हिरोईन शॉपिंग साठी मार्केटमध्ये दाखल झाले. आणि नेहमीप्रमाणे या रंगांमध्ये ती साडी दाखवा, 🤣त्या साडीमध्ये हा रंग दाखवा ,.🤣..
मला तिच्यासारखी साडी हवी आहे. असं करत करत शॉपिंग सुरू झाली. तरीही बायकांचे कसले पोट भरते🤣 पुन्हा दुसऱ्या दुकानात निघूया असं करत दुसरे मार्केट शोधले.. तिथे पुन्हा तेच..
शेवटी माधवीताईंनी दहा मिनिटात बाहेर पडा ..असे सांगून सर्वांना बाहेर काढले .
एका दृष्टीने बरेच झाले शॉपिंग आधीच करून घेतली कारण नंतर खूप बिझी होतो बिलकुल वेळ मिळाला नसता.
ठरलेल्या पटेल हॉटेलमध्ये बाहुबलीला भेटून त्याच्याबरोबर फोटो काढून सर्वजण जेवून तृप्त झाले आणि आपल्या भारती आश्रमात मुक्कामाला आले.
रात्री एक वाजता गिरणार चढायला सुरुवात करायची होती हे माहीत असूनही गप्पांचा फड रंगात आला होता .मग कसेबसे दोन तास झोप काढली आणि एक वाजता सर्वजण निघायला तयार झाले. स्वेटर टोपी नी कॅप सर्व घालून सैनिक सज्ज झाले आणि हातात काठी घेऊन पहिल्या पायरीला नारळ फोडून देवाचा जयघोष करत सर्व ग्रुप निघाला.
मजल दरमजल करत सर्वजण आपापल्या परीने निघाले. काही काही स्पीडने चालणारे तर काही हळूहळू …असं करत करत ..कधी झाडा मध्ये सळसळ आवाज याय चा.. त्यामुळे भीती वाटायची दोन्ही साईडला जंगल पाहून सर्वजण घाबरतही होते आमच्या सोबत संध्याची मोठी बहीण होती. ती सर्व ग्रुप ची ताई झाली आणि ताईला घेऊन जाणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी झाली. तरी सुद्धा माधवीताई ,मानसी मॅडम ,आपटे सर, रीना मॅडम यांनी ताईला पादुकांपर्यंत नेण्याची जबाबदारी पार पाडली. किती तो आनंद वर्णावा..आणि पादुकांवर सर्वजण नतमस्तक झाले.
धन्य झाले … येताना प्रत्येक ठिकाणचे दर्शन घेऊन आमच्या ताईची वरात डोलीतून निघाली अंबामातेच्या मंदिरापासून सर्वजण रोपवेने खाली आले. रूमवर पोचल्यावर मस्तपैकी पायांना मसाजची सोय करण्यात आली होती मसाज झाला गरम पाण्याने अंघोळ झाली आणि सर्वांनी जी झोप ठोकली ती माणसे मॅडमच्या आवाजाने धडपडून जागे झाले स्ट्रेचिंग करण्यासाठी. ज्या इच्छेने प्रेरित होऊन सर्वजण गेले होते ते इच्छा पूर्ण झाली आणि त्यानंतरचे तीन दिवस लोकल मंदिरे आणि पुन्हा थोडीफार शॉपिंग हे चालूच होते आणि आज पुन्हा परतीच्या प्रवासाला सर्वजण निघाले या प्रवासामध्ये माधवी ताईंचे खूप मार्गदर्शन झाले .त्यांनी एक्यूप्रेशरने सर्वांना थेरपी दिली किरण छान सर्वांमध्ये मिसळला.
माधवी ताईने त्यांचे छान अनुभव ऐकवले आणि आदल्या दिवशी छान आमची मानसिक तयारी करून घेतली त्यामुळे हे शक्य झाले त्यांचे खूप खूप आभार…